रिसोड (Farmers Loan Scheme) : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक गजानन पाचारणे यांनी अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत महत्त्वपूर्ण पाठपुरावा सुरू केला आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा (Farmers Loan Scheme) लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी त्यांनी 'दि अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' (ADCC Bank) चे अध्यक्ष डॉ. जयराज (दादा) संतोषकुमार कोरपे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शासनाने कर्जमाफी (Farmers Loan Scheme) केलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीककर्ज मिळण्यात सुविधा उपलब्ध करत. ऐन पेरणीच्या व मशागतीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये म्हणून जिल्हा बँकेने तात्काळ कर्जवाटपाची प्रक्रिया सुलभ करावी, अशी आग्रही मागणी गजानन पाचारणे यांनी केली. वेळेवर संस्थात्मक कर्जपुरवठा न झाल्यास शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बँक अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, शेतकरी हितासाठी बँक प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल आणि यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाईल, असा शब्द दिला.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व कृषी क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठी माजी सभापती गजानन पाचारणे यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकरी हितासाठी माजी सभापती गजानन पाचारणे सरसावले; जिल्हा बँक अध्यक्षांकडे कर्जवाटपाबाबत महत्त्वपूर्ण पाठपुरावा
Farmers Loan Scheme: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक गजानन पाचारणे यांनी अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत महत्त्वपूर्ण
Farmers Loan Scheme
संबंधित सामग्री
कोटगुलला तालुक्याचा दर्जा द्या; ३० गावांच्या २३ मागण्यांचे निवेदन
Kotgula Taluka: पारंपरिक इलाखा ग्रामसभा क्षेत्र कोटगुलअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या विविध विकासकामांसह शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेच्या वतीने..
शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Farmers Thiya Andolan: कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानातील अनुदान अपहार करण्याच्या आरोपावर कारवाईकरिता कडक मागणी करून आंदोलन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर
Farm Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाने 7 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय वाटप यादी जाहीर केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या 13 हजार 989 शेतकऱ्यांची e-KYC अद्याप प्रलंबित
Hingoli Loan Waiver Scheme: हिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी १३,९८९ शेतकऱ्यांवर e-KYC प्रक्रिया अडवली आहे. पाच तालुक्यात बँकेत ४०,५६२ खातांचे प्रलंबित राहिले आहेत.