हिंगोली ऊस गाडी चोरी

शेतातून 2.40 लाखांची ऊस वाहतुकीची डंपिंग गाडी चोरीला, बासंबा पोलिसात गुन्हा दाखल

Hingoli sugarcane cart stolen: हिंगोली जिल्ह्यातील पळसोना शिवारात ऊस वाहतूकीसाठी वापरलेली 2.40 लाखांची डंपिंग गाडी 27 मे ते 28 मे दरम्यान चोरली गेली. पोलीसने गुन्हा दाखल केला आहे,

शेतातून 2.40 लाखांची ऊस वाहतुकीची डंपिंग गाडी चोरीला, बासंबा पोलिसात गुन्हा दाखल

Hingoli sugarcane cart stolen

हिंगोली (Hingoli sugarcane cart stolen) : हिंगोली जिल्ह्यातील पळसोना शिवारातून ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 2 लाख 40 हजार रुपये किमतीची डंपिंग गाडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दत्ताराव बळीराम पवार, रा. पळसोना, ता. जि. हिंगोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी त्यांची भगव्या पिवळ्या रंगाची ऊस वाहतुकीची डंपिंग गाडी पळसोना शेत शिवारातील सर्व्हे नंबर 36/03 येथील पत्र्याच्या शेडजवळ उभी करून ठेवली होती. गाडीवर 'इंडियन वर्क शॉप' असे लिहिलेले आहे. 

दिनांक 27 मे  रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 28 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या (Hingoli sugarcane cart stolen) कालावधीत अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेली. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आज, 1 जून  रोजी बासंबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंडीत यलाप्पा सोळंके, रा. पातोंडा, ता. जि. हिंगोली याच्याविरुद्ध  गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा 1 जून रोजी सायंकाळी  दाखल करण्यात आला. 
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाने करत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026