पाझर तलाव कोरडे

जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा; पाझर तलाव अजूनही कोरडे, शेतकरी चिंतेत

Pazar Lake Dry: पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.

जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा; पाझर तलाव अजूनही कोरडे, शेतकरी चिंतेत

Pazar Lake Dry

 

वन्य प्राण्यांसह जनावरांची पाणी पिण्यासाठी भटकंती

पानकनेरंगाव (Pazar Lake Dry) : जुलै महिना  अर्धा झाला तरी परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक पाझर तलाव अजूनही कोरडे ठाक पडले असून पाण्याची पातळी अत्यंत कमी होत चालली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.

काही ठिकाणी झालेली पेरणीही पुरेशा पावसाअभावी संकटात सापडली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकरच मुसळधार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया: दिलीप विश्वनाथ आरे शेतकरी
परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणीसाठा (Pazar Lake Dry) नसल्याने जनावरे आणि वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी जनावरे आणि वन्यप्राणी  भटकंती करताना दिसत आहेत. लवकरच समाधानकारक पाऊस पडून तलाव पुन्हा भरावेत आणि जनावरे तसेच वन्यप्राण्यांची पाण्याची समस्या दूर व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया: माणीक पल्हाद आरघडे शेतकरी
सेनगाव तालुक्यातील खैरखेडा,महाळशी, शिंदेवाडी,सावरखेडा सूलदली,पानकनेरगासह आदी गावात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांवरील बंधारे व पाझर तलाव कोरडे ठाक आहेत. पेरणी केलेले सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले आहे.

प्रतिक्रिया: गजानन शंकर पूरी शेतकरी
जुलै महिना अर्धा संपत गेला असला तरी पानकनेरगाव परिसरात  अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामत राष्ट्रीय महामार्ग ते खैरखेडा रस्त्यालगत  असलेला बेलदरी पाझर तलाव अजूनही कोरडाठाक आहे. तसेच या तलावाच्या बाजूलाच गावाला (Pazar Lake Dry) पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशनची विहीर सुद्धा आहे. या विहिरीच्या भरोशावर गावाची तहान भागवली जाते सदर पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे

संबंधित सामग्री

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
मान्सूनची परतीची वाटचाल सुरू; महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम

मान्सूनची परतीची वाटचाल सुरू; महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम

मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Sep 21, 2026
‘ट्रिगर-१’वरून लातूर जिल्ह्यात जोरदार घमासान!

‘ट्रिगर-१’वरून लातूर जिल्ह्यात जोरदार घमासान!

लातूर जिल्ह्यात ‘ट्रिगर-१’च्या यादीवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील यादी बनावट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, तर दुष्काळसदृश परिस्थितीवर शेतकऱ्यांचे प्रश्न.

Sep 19, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाण्यात पावसाअभावी खरीप पिके संकटात; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह दिवसा वीजपुरवठा व नादुरुस्त डीपी बदलण्याची शंतनु बोंद्रे यांची मागणी.

Sep 10, 2026
संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

​​​​​​​देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे.

Sep 09, 2026