परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या...!

Parbhani Farmer Suicides: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

परभणीत नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या...!

Parbhani Farmer Suicides

विषारी द्रव केले प्राशन, पेगरगव्हाण येथील शेतकरी

परभणी (Parbhani Farmer Suicides) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शेतकर्‍याचा मृत्यू झाला. या प्रकरणी २२ जुलैला दैठणा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी हा परभणी तालुक्यातील पेगरगव्हाण येथील रहिवाशी आहे. 

शरद गव्हाणे यांनी खबर दिली आहे. त्यांचा भाऊ रामेश्वर रघुनाथ गव्हाणे वय ३५ वर्ष यांनी सततच्या (Parbhani Farmer Suicides) शेतीच्या नापिकीला आणि बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान २० जुलै रोजी सदर शेतकर्‍याचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास सपोउपनि. फड करत आहेत.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू 
परभणी :
नदी घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास गंगाजी बापू जवळील गोदावरी नदीपात्र पिंपळगाव लिखा शिवार ता. पूर्णा येथे घडली. रंगनाथ मुळे यांनी खबर दिली आहे. मधुकर डिगांबर काळे वय ३५ वर्ष, असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. काकडे करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026