शेतकरी पिता-पुत्र आत्महत्या

कर्जाचा डोंगर, नापिकीचा घाव...अखेर बाप-लेकाचा जीवनप्रवास संपला!

Farmer father-Son Suicide: सततची नापिकी, वाढता कर्जाचा बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावाने त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना

कर्जाचा डोंगर, नापिकीचा घाव...अखेर बाप-लेकाचा जीवनप्रवास संपला!

Farmer father-Son Suicide

 

खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारातील हृदयद्रावक घटना; गावावर शोककळा

खामगाव (Farmer father-Son Suicide) : तालुक्यातील पारखेड शिवारात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सततची नापिकी, वाढता कर्जाचा बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावाने त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबांपुढील बिकट वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पारखेड येथील संतोष हरिचंद्र गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल संतोष गावंडे यांनी शेतातील कांदा चाळीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.  सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून आलेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या (Farmer father-Son Suicide) प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमकी कारणे, आर्थिक परिस्थिती तसेच इतर सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे पारखेड गावासह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारी नापिकी आणि कर्जाचा वाढता भार यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे गंभीर संकटाचा सामना करत आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत, मानसिक आरोग्याचे समुपदेशन आणि प्रभावी आधारव्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संबंधित सामग्री

उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

नांदेड जिल्ह्यात केळी पिकांवर अचानक पिवळावी परिस्थिती झाली आहे, ज्या कारणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च करताना तणताना दिसून आले आहे.

Sep 05, 2026
ऊस कडू झाला, साखर गोड झाली; ऊस उत्पादक शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल?

ऊस कडू झाला, साखर गोड झाली; ऊस उत्पादक शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल?

उत्पादनावर प्रक्रिया करून होणाऱ्या साखरेपासून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

Aug 29, 2026
श्रीलंकेच्या संगीतविश्वावर शोककळा; प्रसिद्ध गायिका नंदा मालिनी यांचे ८२व्या वर्षी निधन

श्रीलंकेच्या संगीतविश्वावर शोककळा; प्रसिद्ध गायिका नंदा मालिनी यांचे ८२व्या वर्षी निधन

​​​​​​​श्रीलंकेच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आणि सामाजिक-राजकीय विषयांवर आपल्या गीतांमधून ठाम भूमिका मांडणाऱ्या नंदा मालिनी यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.

Aug 21, 2026
मानोरा तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित; शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योगाअभावी तरुणांचे स्थलांतर

मानोरा तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित; शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योगाअभावी तरुणांचे स्थलांतर

Manora Taluka Development: आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यातील अती मागास असलेला मानोरा तालुका आजही शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि सिंचनासारख्या मूलभूत सुविधांपासून कोसो दूर

Aug 09, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026