शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम

तेल्हारा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम

Farmer Guidance Camp: तेल्हारा येथे खरीप हंगाम 2026 पूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कृषी तज्ज्ञांच्या उपस्थितीत झाले, ज्यात नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

तेल्हारा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम

Farmer Guidance Camp

चिखली (Farmer Guidance Camp) : मौजे तेल्हारा ता. चिखली येथे खरीप हंगाम 2026 पूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 8 मे रोजी सकाळी 9 वाजता कृष्ण मंदिर सभामंडप येथे करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथील कीटक शास्त्रज्ञ मा. श्री प्रवीण देशपांडे, तालुका कृषी अधिकारी श्री अशोक सुरडकर, मंडळ कृषी अधिकारी श्री कपिल कंकाळ, उप कृषी अधिकारी श्री दीपक गवते, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती वैशाली रिंढे, श्रीमती अर्चना वाकोडे, श्रीमती सीमा बाहेकर तसेच ग्राम महसूल अधिकारी इंदू शेजोळ यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हुमणी अळी नियंत्रणासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजना, सोयाबीनसाठी घरच्या बियाण्यांचा वापर, बीजप्रक्रियेचे महत्त्व व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या सोयाबीन वाणांची निवड, घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीबीएफ पद्धतीने पेरणीचे फायदे-तोटे तसेच विविध पिकांसाठी संतुलित व शिफारशीत खत व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी श्री अशोक सुरडकर यांनी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, पोखरा अंतर्गत फळबाग लागवड तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा व इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन केले. तसेच बीबीएफ प्लांटरसाठी ऑनलाइन अर्ज करण्याबाबतही माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती वैशाली रिंढे यांनी केले.

यावेळी अभिमन्यू कुटे, मनोज कुटे, शिवाजी पानझाडे, रुपराव कुटे, दिलीप गाडेकर, भास्करराव कुटे, समाधान गाडेकर, कैलास कुटे, विशाल पानझाडे, आनंदा कुटे, अशोक गाडेकर, भीमराव कुटे, मधुकर कुटे, सतीश गव्हले, दत्तात्रेय कुटे, रुस्तुम कुटे, शेख रशीद, दिनकर कुटे, श्रीकृष्ण गवले, नंदकिशोर कुटे, अर्जुन कुटे, आत्माराम चवरे, मदन साने, दिलीप खंबायतकर, रतन कुटे, दामोदर कुटे, प्रभाकर ठोंबरे, संजय कुटे, रामदास कुटे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026