वीज कोसळून बैल मृत्यू

पहिल्याच पावसात वलनी येथे वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Bull Lightning Death: सावनेर तालुक्यातील वलनी गावात, पहिल्या पावसाच्या दिवशी वीज कॉसळून शेतकरी महादेव शिवारऊके यांच्या बैलाचा मृत्यू. दोन महिन्यापूर्वी १ लाख २० हजाराची बेलांची जोडी घेतली होती.

पहिल्याच पावसात वलनी येथे वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Bull Lightning Death

खापरखेडा (Bull Lightning Death) : सावनेर तालुक्यातील वलनी येथे आज परिसरात झालेल्या हंगामातील पहिल्याच पावसादरम्यान वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वलनी येथे घडली. या घटनेत शेतकरी महादेव शिवारऊके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

माहितीनुसार, महादेव शिवारऊके रा वलनी ता सावनेर यांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एक लाख वीस हजार रुपये खर्च करून बैलांची जोडी (Bull Lightning Death) खरेदी केली होती. आज पहिला पाऊस सुरू असताना विजांच्या कडकडाटासह अचानक वीज कोसळली. यावेळी शिवारऊके यांच्या बैलजोडीतील एका बैलाला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नुकतीच खरेदी केलेल्या बैलजोडीतील एक बैल दगावल्याने शिवारऊके यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीच्या हंगामाच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यास शासनाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. हंगामातील पहिल्याच पावसात घडलेल्या या (Bull Lightning Death) घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात विजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरे व नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

Sep 19, 2026
डिग्रस कऱ्हाळे येथे वीज अंगावर पडल्याने महिला जखमी, पती बचावला

डिग्रस कऱ्हाळे येथे वीज अंगावर पडल्याने महिला जखमी, पती बचावला

Woman Lightning Death: डिग्रास कऱ्हाळे येथे शेतकरी पत्नी निशा दादाराव शेळकेच्या वीज असे घुसल्याने गंभीर जखम होण्याची घटना झाली. ते शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल आहेत.

Jun 29, 2026
इसापूर येथे रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

इसापूर येथे रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

Wild boar attack: पेरणी करीत असताना अचानक रान डुकराच्या कळपातील एका रान डुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

Jun 29, 2026
परभणीत वादळी वाऱ्यात विजेच्या खांबासह रोहित्र आणि झाडे कोसळली...

परभणीत वादळी वाऱ्यात विजेच्या खांबासह रोहित्र आणि झाडे कोसळली...

Parbhani Stormy winds: रभणीतील गंगाखेड येथील शुक्रवर रात्री वादळी वाऱ्याने खळी गावासह शिवाराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. रोहित्र (डिपी) व अनेक खांब कोसलेल्या मातीत जनावरांचा पाण्याचा पुरवठा समस्या

Jun 14, 2026
पत्नीला औताला जुंपणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या मदतीला अक्का फाऊंडेशन; २० हजारांची रोख मदत

पत्नीला औताला जुंपणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या मदतीला अक्का फाऊंडेशन; २० हजारांची रोख मदत

घटनेचे वृत्त देशोन्नती डिजिटलमध्ये प्रसिद्ध होताच सामाजिक संस्था आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेत मदतीचा हात पुढे केला आहे.

Jun 10, 2026