Washim :- तालुक्यातील जोगलदरी गावात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात महिला शेतकरी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी वन विभागाकडे (Forest Department) नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
घटनेनंतर जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी वन विभागाकडे नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, यासाठी लेखी निवेदन
मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा सुभाष राठोड या महिला शेतकरी (Farmer)शेतात काम करत असताना अचानक बिबट्यासारख्या हिंस्र वन्य प्राण्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात यशोदा राठोड यांनी हिमतीने प्रतिकार केला; मात्र झटापटीदरम्यान त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी वन विभागाकडे नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, यासाठी लेखी निवेदन दिले आहे. दिनेश राठोड यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या शारीरिक नुकसानीसाठी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.