वसमत शहरात शिवसेना कार्यालय उद्घाटन
वसमत शिवसेना शहर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संतोष बांगर यांची घोषणा
वसमत (MLA Santosh Bangar) : आगामी नगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत मी आमदार म्हणून गप्प बसणार नाही तर कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून कार्यकर्त्यासाठी मैदानात उतरणार आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करू नये कामाला लागा अशा शब्दात आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. वसमत येथील शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत होते.
वसमत येथे शिवसेना शहर कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पार पडले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कळमनुरी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा युवा जिल्हाप्रमुख राम कदम तालुकाप्रमुख राजू चापके संजय बोंढारे फकीरा मुंडे डॉक्टर एम आर क्यातमवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी बोलताना वसमत नगरपालिकेवर या शिवसेनेचा नगराध्यक्ष होता यापुढेही शिवसेनेचा नगराध्यक्ष राहील व सर्वात जास्त जागा नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या येतील, असे सांगितले.
तालुकाप्रमुख राजू चापके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले स्वबळावर जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक लढवावी, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. शिवसेना नेते डॉक्टर एम. आर. क्यातमवार यांनी मार्गदर्शन करताना वसमत शहर व तालुक्यात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकविण्यासाठी वसमतचे शिवसेना कार्यकर्ते यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जोरदार फटकेबाजी केली स्वबळावर लढण्याची इच्छा तालुकाप्रमुख राजू चापके यांनी व्यक्त केली या मुद्द्यावर बोलताना संतोष बांगर म्हणाले की, तिकीट वाटप करताना योग्य व्यक्तीला करा जवळच्या नातेवाईकाला तिकीट वाटप करण्याचा आग्रह करू नका युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने घ्यावा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार म्हणून सविता मारुतराव क्यातमवार या सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महिलांची संख्या ही मोठी होती. नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर एम. आर. क्यातमवार यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
नुसता दाढीवरून हात फिरवला तरी विषय क्लोज
यावेळी संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आपल्या स्टाईल मध्ये भाषण करताना आपण निवडून आल्यानंतर जातीपातीचे राजकारण केले नाही कोणीही समाजाचा जातीचा धर्माचा नागरिक आपल्याकडे काम घेऊन आला तर त्याचे काम आपण करत असतो मात्र आपल्या आया बहिणीवर कोणी वाकडी नजर केली तर मात्र त्याची गाय करत नाही अशी त्यांनी सांगितले नुसता दाढीवरून हात फिरवला तरी विषय क्लोज होतो, केंद्रातही दाढी महाराष्ट्रात हे दाढी व हिंगोली सुद्धा दाढी आहे त्यामुळे चिंता करू नका असे त्यांनी यावेळी सांगितले मी सर्वांना सामान्यांसाठी आहे निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर एम. आर. क्यातमवार यांच्या कामाचे कौतुक
यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी शिवसेने मध्ये नव्याने दाखल झालेले डॉक्टर एम. आर. क्यातमवार त्यांच्या कामाची दखल घेतली डॉक्टर म्हणून ते सामाजिक सेवा करतात गेल्या 30 वर्षापासून ते वसमत मध्ये पैशाची अपेक्षा न करता रुग्णाची सेवा करतात हे फार मोठे कार्य आहे त्यामुळे अशा चांगल्या माणसाची शिवसेनेमध्ये कदर होईल आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सविता मारोतराव क्यातमवार या शिवसेनेच्या उमेदवार असतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.