‘देशिकेंद्र’च्या बोगस भरती प्रकरणात पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांचे आदेश
लातूर (Secondary Education Officer) : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या देशिकेंद्र विद्यालयात संस्थाचालकांना चुना लावत झालेल्या बेकायदा नोकर भरती प्रकरणी लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित घोटाळ्यामध्ये सहभागी असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच (Secondary Education Officer) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य आरोपी करावे, असे आदेश पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांनी लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
देशिकेंद्र विद्यालयांमध्ये नोकर भरती करताना संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांशिवाय थेट मुख्याध्यापिकेने नोकर भरती केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर एखाद्या मुख्याध्यापिकेने अशी नोकर भरती केल्याचा हा अफलातून प्रकार महाराष्ट्रात नावाजलेल्या देशिकेंद्र विद्यालयात घडला.
बाबत सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुराव भोसले यांनी शिक्षण उपसंचालकांसह सर्व संबंधितांना पत्र देत बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची मागणी केली. मात्र त्यावर लातूरच्या (Secondary Education Officer) शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालकांनी तात्काळ कारवाईस दिरंगाई केल्याने या प्रकरणातील तक्रारदार भोसले यांनी थेट पुण्याच्या शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांच्याकडे तक्रार केली. अकरा व बारा मार्च असे सलग दोन दिवस भोसले यांनी या प्रकरणात तक्रार केल्यानंतर अखेर पुण्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ यांनी याप्रकरणी 28 मार्च रोजी आदेश काढला.
देशी केंद्र विद्यालयात स्नेहलकुमार नामदेव खुडे या सेवकाचे प्रथम वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य आदेश एक जुलै 2022 शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट केलेला आदेश 18 नोव्हेंबर 2024 हा पंधरा दिवसाच्या आत तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भोसले यांनी केली होती. या (Secondary Education Officer) प्रकरणात सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती एस. के. कल्याणी, संबंधित सेवक स्नेहल खुडे, सहशिक्षक हे जे मुसळे, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध तात्काळ एफ आय आर दाखल करावा, अशी मागणी भोसले यांनी केल्याने या मागणीची दखल घेत शिक्षण उपसंचालक डॉक्टर वंदना वाहुळ यांनी लातूरचे (Secondary Education Officer) विभागीय शिक्षण उपसंचालक यांना हे आदेश काढले आहेत. या देशावर लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक किती तत्परतेने कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.




