शिवशंभूभक्तांची उसळली तोबा गर्दी; दोन्ही स्क्रीन हाउसफुल!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” चित्रपटाचा निशुल्क शोचे आयोजन धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्याकडून त्याची नात धर्मवीराच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने करण्यात आले होते.
बुलढाणा शहरातील एआरडी सिनेमॉल येथे आज शनिवार २२ फेब्रुवारी रोजी आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यावतीने त्यांच्या लाडक्या नातीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” चित्रपटाच्या निशुल्क शो चे आयोजन आ. गायकवाड यांच्याहस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी समस्त शिवभक्तांच्या साक्षीने धर्मवीरा हिच्या वाढदिवसाच्या निमित्याने केक कटिंग करण्यात आले, यावेळी सर्व शिवभक्तांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा अध्यक्ष राजेंद्र काळे, राजेश देशलहरा, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवभक्त शिवप्रेमी माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.