यवतमाळ (Nagar Parishad Election) : नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर जिल्ह्यातील १० नगर परिषदेतून हजारो हरकती दाखल झाल्या होत्या या . हरकतीं निकाली काढण्यासाठी प्रशासनाला मोठी धावपळ करावी लागली आहे . त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय तपासणी करून जिल्ह्यातील १० नगर परिषदेच्या अंतिम मतदार याद्या ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व आक्षेप नोंदविण्याची (Nagar Parishad Election) मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत होती. या काळात या हरकती प्राप्त झाल्या होत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त आक्षेप यवतमाळ नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीवर घेण्यात आल्या होत्या. उद्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने लवकरच नगर परिषद निवडणूकीचा बिगुल वाजेल अशी शक्यता निर्माण झाली आहे मात्र जोपर्यंत निवडणूका जाहीर होणार नाही तोपर्यंत काही खरे नाही असे इच्छूकांनकडून बोलले जात आहे.
७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या होणार प्रसिद्ध
जिल्ह्यातील १० नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमानित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १० ही (Nagar Parishad Election) नगरपालिकेच्या मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या सुद्धा ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजुनच मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून अंतिम मतदार यादी प्रसिद्धा झाल्यानंतर इच्छुकांकडून मतदारांच्या भेटी-गाठी घेण्याची स्पर्धा अनखिनच वाढणार आहे.




 
			 
		

