नागपूर येथे उपचारादरम्यान झाला मृत्यू
गडचिरोली (Senior clerk Death) : स्थानीक पोलीस अधीक्षक कार्यालयात वरीष्ठ लिपीक पदावर कार्यरत विलास शंकर वासनिक (५७) रा. मुरखळा यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान (Senior clerk Death) मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय चौकातून दुचाकीवरून कार्यालयात जात असतांना एमएच ३४ एम८९७० क्रमांकाच्या हायवा ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली होती.
या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. (Senior clerk Death) अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ वासनिक यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने नागपूरात हलविण्याचा सल्ला दिला. याची दखल घेत प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरने नागपूर येथील ऑरेंज सिटी रूग्णालयात पाठविले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वासनिक यांन जीवनदान देण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने प्रयत्त्नांची शर्थ केली. मात्र त्यांच्या प्रयत्नास अपयश आले. या (Senior clerk Death) घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.