Wani :- वणी – घुग्गुस राज्य महामार्गावरील मंदर फाट्याजवळ धावत्या मोटारसायकलला अचानक आग (Fire) लागली. या आगीत मोटारसायकल जळून झाली. ही घटना ३० जुलैला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकी चालकाला मात्र कुठलीही इजा झाली नाही.
तालुक्यातील पुरड (पुनवट) येथील रहिवाशी असलेला वैभव संतोष पिदूरकर (२१) हा तरुण त्याने नव्यानेच घेतलेल्या होंडा शाईन मोटारसायकलने वणीकडे येत असतांना त्याच्या मोटारसायकलला अचानक आग लागली. मोटारसायकल मधून धूर निघत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने तात्काळ मोटारसायकल थांबविली. मात्र क्षणातच आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण मोटारसायकल (Motorcycle) आपल्या कवेत घेतली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.