नदीमध्ये शोध मोहीम सुरु!
साखरा (Flood) : सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील युवक पुराच्या पाण्यातून वाहून गेला होता. नदीमध्ये शोध मोहीम सुरु असताना सोमवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास धोंडीबा घोगरे हा युवक 16 ऑगस्ट रोजी शेतात भाकरी घेऊन जात असतांना नदीला पुर आलेला होता. पुराचा अंदाज न आल्याने तो युवक पुराच्या प्रवाहात वाहुन गेला होता. याची माहिती गावातील लोकांना कळताच त्या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस (Police) आणि महसुलचे कर्मचारी (Revenue Officers) शोधाशोध करत होते. परंतु, 17 ऑगस्ट रोजी पर्यंत त्यांना यश मिळाले नाही. 18 ऑगस्ट रोजी सकाळी रामनगर जवळच्या नदीच्या पात्रात त्या युवकाचा मृतदेह आढळला. या मयत युवकासह पाच भाऊ आहेत जमीन मात्र चारच एकर आहे. रोजमजुरी करून कसेबसे आपले जीवन जगत होते. मयताच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई असा परिवार आहे. सोमवारी सकाळी 12 वाजता या युवकाचे शवविच्छेदन कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह नातेवाईंकाच्या स्वाधिन करण्यात आला. यावेळी वैद्यकिय अधिकारी नवनाथ पडोळे, सेवक दिलीप हाके, बीट जमादार पाचपुते इतर महसुलचे कर्मचारी हजर होते. नंतर, मयत धोंडीबा घोगरे याच्यावर घोरदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.