भंडारा/बारव्हा (Food supply department) : लाखांदूर तालुक्यातील शासकीय स्वस्तधान्य दुकानामार्फत गोरगरीब जनतेला पुरविण्यात येणारे बिपीएल अंत्योदय योजनेचे अन्नधान्य सदोष गुणनियंत्रीत असून भरडाईपुर्ण तांदळात ३० ते ३५ टक्के खंडा मिसळून शासनाला पुरविल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप जनतेत केला जात आहे. सदरचा गैरप्रकार भातगिरणी चालकांनी (Food supply department) अन्नपुरवठा विभागातील काही अधिकार्यांना हाताशी धरून चिरीमिरी देऊन लाखांदुर तालुक्यात चालविल्याचा आरोप करून सबधित गैरप्रकारात शासन नियमाची पायमल्ली होत असल्याची बोंब सर्वत्र केली जात असून पुरवठा अन्नधान्य हे हंगामबाहय असल्याची देखील विस्वसनिय माहीती आहे.
सदोष गुणनियंत्रीत भरडाईपुर्ण तांदळाचा शासनाला सर्राष पुरवठा
सदर आधारभूत केंद्रातील धान तालुक्यातीलच ३८ भातगिरणी मधून भरडाई केले जात आहेत तसा उचल आदेश भात गिरणी चालकांना जिल्हा पणन अधिकार्याकडून दिल्या जात असून भरडाई पुर्ण अन्न धान्य शासनाच्या पुरवठा विभागाला पूरविले जात आहे. सदर प्रक्रियेत भरडाईसाठी धान्याची उचल व भरडाई पुर्ण (Food supply department) अन्नधाण्याच्या पुरवठ्यासाठी येणारा वाहतूक भाडे खर्च देखील प्रती क्विंटल दराप्रमाणे शासनाकडून देय आहे. मात्र सदरचा देय यंदाच्या खरिप हंगामातील धानाची उचल व भरडाई करून शासन पुरवठ्यासाठी लागू असतांना भात गिरणी चालकाकडून हंगामपुर्व धानाची भरडाई होऊन शासनाला पुरवठा केल्या जात असल्याची देखील खळबळजनक माहिती आहे. दरम्यान शासनाला पुरविण्यात येणारे भरडाई पुर्ण तांदळात कमाल २५ टक्के खंडा मिश्रीत असने अपेक्षित आहे.
पुरवठा दाखल तांदळात ३० ते ३५ टक्के खंडा असल्याचा आरोप
सदरचे पुरवठ्यादाखल तांदळची गुणनियंत्रकाकडून साठानिहाय किमान १०टक्के चाचणी होणे शासन नियमात आहे. मात्र लाखांदुर तालुक्यात या सबंध शासननियमाची मायमल्ली होताना भरडाई पुर्ण तांदूळ पुरवठा धाराकडून अधिकार्याकर्वी प्रतीसाठा हजारोची चिरमिरी घेऊन सदोष गुणनियंत्रणात चक्क ३० ते ३५ टक्के खंडामिश्रीत तांदळाचा शासनाला पुरवठा (Food supply department) होत असल्याच्या माहितीने एकच खळबळ उडाली आहे. यासबंधाने अधिक माहिती घेतलीअसता एका साठ्यामध्ये कमाल २७० क्विंटल धान्याची तब्बल ५४० पोती असून शासन नियमानुसार कमाल १० टक्के पोती मधील धान्याचे गुणनियंत्रनकरणे अनिवार्य आहे.
मात्र या नियमाला बगल देत (Food supply department) अन्नपुरवठा विभागातील अधिकार्याकडून गुणनियंत्रणाचा देखावा करून चिरीमिरी घेऊन सदरचा गैरप्रकार संगनमताने सूरू असल्याचा आरोप देखील जनतेने केला आहे. एकिकडे शासनस्तरावर दारिद्र्य निर्मुलनासाठी गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या विविध उपाययोजना होत असतांना प्रशासनाकडून मात्र शासन नियमाची उघडउघड पायमल्ली होत असेल तर या गैरप्रकारात दोष कुणाचा? असा संतप्त सवाल गोरगरीब जनतेत केला जात आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन सदोष गुणनियंत्रीत भरडाई पुर्ण धान्याचा पुरवठा थांबवीतांना दोषी पुरवठादार व (Food supply department) अन्नपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचार्यांविरोधात कार्यवाही करून गुणवत्तायुक्त भरडाई पुर्ण तांदळाचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गोर, गरिब लाभार्थ्यांमधे जोर धरू लागला आहे.




