Kurkheda :- धान घोटाळ्यामूळे वादग्रस्त ठरलेल्या देऊळगांव आविका संस्थे अंतर्गत येणार्या शिरपूर, देऊळगांव, अरततोंडी व खरमतटोला येथील शेतकर्यांच्या बोनसची रक्कम आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाने चौकशीचे कारण पूढे करीत धान्य बोनस रोखून धरल्याने संतप्त शेकडो शेतकर्यांनी आज दि. ७ ऑगस्ट रोजी टी. डी सी. कार्यालयासमोर उपोषणाला सुरवात केली असून जोपर्यंत धान्य विक्री करणार्या शेतकर्यांच्या खात्यात बोनसची रस्कम जमा होत नाही व अन्य मागण्यांची पुर्तता होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे आज भर पावसातही (Rain)उपोषण सुरूच होते.
जो पर्यंत खात्यात बोनस जमा होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
देऊळगांव आविका संस्थेच्या धान घोटाळ्याची पोलीस चौकशी सूरू आहे. मात्र या प्रकरणाशी कोणताच थेट संबध नसलेल्या येथील शेतकर्यांची शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली हेक्टरी २० हजाराची रक्कम आदिवासी विकास महामंडळ (Tribal Development Corporation) प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचा कडून अडवून ठेवण्यात आली आहे . तालूक्यातील अन्य संस्थेच्या जवळपास सर्व शेतकर्यांच्या बोनसची रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र येथील ४ गावातील एकूण ६०८ पात्र लाभार्थी शेतकर्यांच्या बोनसची रक्कम रोखून धरण्यात आल्याने संतप्त शेतकर्यांनी आज आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कूरखेडा येथे उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाची माहिती मिळताच भाजपा (BJP) जिल्हा प्रा.रमेश बारसागडे, माजी खा. अशोक नेते, माजी आ. कृष्णा गजबे, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी उपोषण स्थळी भेट देवून शेतकर्यांना बोनस पासून वंचित ठेवणार्या अधिकार्याला जाब विचारून धारेवर धरले. यावेळी अधिकार्यांनी दोन दिवसात बोनस चे पैसे जमा करू असे सांगण्यात आले आहे.