हिंगोली/सेनगाव (Forest Department) : सेनगाव तालुक्यातील खुडज फाट्यावर वन विभागाच्या पथकाने १५ जूनला रात्रीच्या गस्ती दरम्यान सागवानाच्या लाकडासह एक टेंम्पो पकडला.
अनेक ठिकाणी अवैधरित्या वृक्षतोड होत असल्याने विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी (Forest Department) वन विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची पथके तैनात केले आहेत. ज्या ज्या ठिकाणी वृक्षतोड होत आहे तेथील पाहणी केल्यानंतर अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे वाहने ताब्यात घेतली जात आहेत. खुडज पाटी जवळ वन विभागाचे पथक १५ जूनला रात्रीची गस्त करीत असताना एका टेंम्पोतून लाकडाची वाहतुक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रारंभी चालकाकडे पथकाने चौकशी केले असता त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे पथकाने सागवनासह टेंम्पो ताब्यात घेऊन सेनगाव (Forest Department) वन विभागाच्या कार्यालयात आणला. या बाबतची पथकाने माहिती घेतली असता जिंतूर येथील एका व्यक्तीने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील एका शेतकर्याच्या शेतातील सागवानाची झाडे खरेदी केली होती. परंतु झाडे तोडण्याची वाहतुकीची परवानगी न घेता, झाडे तोडून त्याची टेंम्पोतून वाहनतुक केली जात होती. ही कामगिरी विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनरक्षक सचिन माने, सेनगावचे वन परिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, वनपाल जी.पी. मिसाळ, वनरक्षक विशाल मुदिराज यांच्या पथकाने केली आहे. या टेंम्पोतील सागवन जवळपास ५० हजार रुपयाचे असल्याचे पथकाने सांगितले.