झाडे झुडपे गवत जळून खाक मात्र अनर्थ टळला
रिसोड (Forest Fire) : रिसोड गणेशपुर मार्गावर वनीकरण विभागाच्या जमिनीवर विद्युत तारे तुटून झालेल्या स्पार्किंगमुळे Forest Fire) आग लागून या आगीमधे झाडेझुडपे गवत जळून खाक झाले. मात्र अग्निशमन विभागाच्या तत्परतेने सदर आग शेतकऱ्यांच्या शेती व कोठे पर्यंत जाण्याआधीच विझवण्यात आली यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचले. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:15 वाजता घडली.
या बाबत माहिती अशी की, गणेशपुर मार्गावर वनीकरण विभागाची जमीन असून या जमिनीवर मोठ्या प्रमाणात गवत झाडे झुडपे आहेत. दुपारी सव्वातीन वाजता या भागात काही विद्युत तारे तुटले असल्याची माहिती मिळाली व यामुळे स्पार्किंग झाला. स्पार्किंग च्या ठिग्न्या (Forest Fire) ह्या खाली पडल्या व या ठिकाणी असलेल्या गवत, झाडेझुडपाला आग लागली.
आग मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असताना, या दरम्यान रिसोड नगरपरिषदच्या अग्निशमन विभागाला याबाबत सूचना देण्यात आली. रिसोड नगर परिषद चे अग्निशमन दलाचे वाहक ताजेकोद्दिन उर्फ कालुभाई, गजू पवार यांनी घटनास्थळी पोहोचून सदर (Forest Fire) आग विझवली. यामुळे बाजूचे शेतकऱ्यांचे गहू व हरभरा पिकाला नुकसान होण्यापासून वाचले. सदर आग विझवण्यासाठी अंबादास लेकुरवाळे, प्रकाश गवळी,सईद खान, गणेश कोकाटे यांनी सहकार्य केले.