मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १५१००० रुपयांचा धनादेश सुपूर्द
रिसोड (CM Relief Fund) : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात संकटात आहे. या शेतकरी बांधवांच्या संकटाच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत राज्याचे माजी मंत्री (Anantrao Deshmukh) अनंतराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी (CM Relief Fund) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत माजी आमदाराचे तीन महिन्याचे पेन्शन जमा करणार असल्याचे सांगितले होते.
अमरावती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे (CM Relief Fund) मुख्यमंत्री सहायता निधी १५१००० रुपयांचा धरादेश अनंतराव देशमुख यांनी सुपूर्द केला. राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत असून राज्याचे देवेंद्रजी फडणवीस सरकार ठामपणे शेतकरी बांधवांच्या सोबत आहे. यावेळी शेतकरी बांधवांप्रती सामाजिक बांधिलकी जपत लोकनेते माजी मंत्री माजी खासदार आदरणीय अनंतरावजी देशमुख साहेब (Anantrao Deshmukh) यांनी माजी आमदाराचे तीन महिन्याचे पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १,५१००० रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, भाजप प्रदेश महामंत्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल दादा देशमुख, भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, रिसोड ग्रामीण मंडळ अध्यक्ष सुभाषराव खरात, गोवर्धन मंडळाध्यक्ष अमोल भुतेकर, रिसोड नगरपरिषदेच्या अध्यक्ष विजयमालाताई आसनकर, कृष्णाजी महाराज आसनकर, पंचायत समिती सदस्य तथा सरचिटणीस रिसोड मंडळ संदीप धांडे, भूषण पाटील दांदडे, सहित मान्यवरांची उपस्थिती होती.