अतिवृष्टीने बाधित व गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा – डॉ. हंसराज वैद्य
नांदेड (Free Deafness Camp) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वैद्य रुग्णालय (Vaidya Hospital) , उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेड आणि निर्मल रिहॅबिलिटेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बहिरेपणा (Free Deafness Camp) आणि श्रवणयंत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.
नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरात फक्त नाव नोंदणी केलेल्या रुग्णांची तपासणी केली जाईल. नाव नोंदणी पूर्णपणे मोफत असून, त्यासाठी डॉ. श्वेता शिंदे (९१३७३१४७४१), डॉ. क्षितिज निर्मल (८४०८८०३९२९), तसेच आयोजक डॉ. हंसराज वैद्य (९४२३१३८३८५) किंवा प्रभाकर कुंटूरकर (९६०४०६०९०२) यांच्याशी संपर्क साधावा. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी त्यांचे नियमित औषधोपचार आणि जुन्या आजारांच्या वैद्यकीय तपासणीच्या फाईल्स सोबत आणाव्या.
तपासणीनंतर योग्य ठरलेल्या रुग्णांना नामांकित कंपन्यांच्या डिजिटल आणि सूक्ष्म श्रवणयंत्रांवर ५०% सूट, दोन वर्षांसाठी मोफत दुरुस्तीची हमी, मोफत बॅटरी तपासणी आणि जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित रिचार्जेबल श्रवणयंत्र (Free Deafness Camp) बसवण्याची संधी दिली जाईल.या शिबिराचा लाभ अतिवृष्टीने बाधित व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य आणि आयोजकांनी केले आहे.