आमदारांच्या उपस्थितीत जनआरोग्य योजनेचा शुभारंभ
हिंगोली (Sanjeevani Children Hospital) : हिंगोली जिल्ह्यातील पहिले बाल अतिदक्षता विभाग असलेल्या संजीवनी बाल रुग्णालयात आता रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेचा औपचारिक शुभारंभ 13 जुलै रोजी आमदार तानाजीराव मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी (Sanjeevani Children Hospital) संजीवनी हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि ही सुविधा हिंगोली जिल्ह्यासाठी एक “आरोग्याचे वरदान” ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
हिंगोलीच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची गरज ओळखून संजीवनी बाल रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले बाल अतिदक्षता (NICU/PICU) विभाग उभारण्यात आले आहेत. आता या (Sanjeevani Children Hospital) रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नवजात शिशु व लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहेत.
ही योजना लागू झाल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, उपचारासाठी नांदेडसारख्या शहरांमध्ये जावे लागणार नाही. संजीवनी हे जिल्ह्यातील पहिले व एकमेव बाल रुग्णालय आहे जे या योजनेअंतर्गत बालकांवर मोफत उपचार देणार आहे. या (Sanjeevani Children Hospital) कार्यक्रमाचे आयोजन डॉ. स्नेहल नगरे, डॉ. विनोद बिडकर, डॉ. मनीष मुपकलवार, डॉ. नागेश बांगर आणि टीम संजीवनी यांनी केले होते. या सोहळ्याला परिसरातील नागरिक, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




