परभणीच्या सायळा सुनेगाव येथील घटना
परभणी/गंगाखेड (Funeral objection ) : माझ्या मालकीच्या जागेत अंत्यविधी करायचा नाही म्हणत एका ७५ वर्षीय महिलेच्या अंत्यविधीला शेत मालकाने हरकत घेतल्याची घटना बुधवार १९ मार्च रोजी तालुक्यातील सायळा सु. येथे घडली. या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मध्यस्थीने सायंकाळी उशिराने (Funeral objection) अंत्यविधी करण्यात आला.
तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मध्यस्थीने झाला अंत्यविधी
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सायळा सुनेगाव येथील गीताबाई वामन साठे वय ७५ वर्ष या वयोवृद्ध महिलेचे बुधवार १९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी (Funeral objection) अंत्यविधीची तयारी करत त्यांची अंतयात्रा गट क्रमांक २१६ मधील गावठाण परिसरात असलेल्या श्मशान भूमीत नेली असता ही जागा माझ्या मालकीची आहे. तुम्ही येथे अंत्यसंस्कार करू नका गट क्रमांक २१५ व २१६ च्या सातबारा उताऱ्यावर श्मशान भूमीचा कुठेही उल्लेख नसल्याचे सांगत शेत मालक विलास रानबा कांबळे यांनी अंत्यविधीला हरकत घेत अंत्यसंस्कारासाठी शासनाने कायम स्वरूपी श्मशान भूमी द्यावी असे म्हणत विलास रानबा कांबळे यांनी त्यांच्या जागेत गीताबाई वामन साठे यांचा अंत्यविधी करण्यास हरकत घेतल्याने सायळा सुनेगांव येथे काही काळ तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.
श्मशान भूमीचा प्रश्न कायम
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस सहाय्यक अधिक्षक ऋषिकेश शिंदे, तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर, पोलीस जमादार दिपक व्हावळे, रुमणा जवळा सज्जाचे तलाठी आदींनी सायळा सुनेगाव येथे धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.
तेंव्हा येथे शासकीय श्मशान भूमी (Funeral objection) नसल्याने गट क्रमांक २१६ मधील गावठाणमध्ये फार पूर्वीपासून अंत्यसंस्कार केले जात होते असे ग्रामस्थांनी सांगितले परंतु आज रोजी गावातील लोकसंख्या वाढल्याने व या परिसरात घरे बांधल्याचे समोर आल्याने अंत्यविधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने तहसीलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे यांनी मध्यस्थी करत गावातील सरपंच, उपसरपंच व काही प्रतिष्टीत नागरिकांच्या मदतीने शेत मालक विलास कांबळे यांच्याशी संवाद साधून आज रोजी हा अंत्यविधी येथे करण्यास परवानगी देण्याची विनंती करत लवकरच गावाला श्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने हा अंत्यविधीचा प्रश्न तात्पुरता निकाली निघाला व सायंकाळी उशिराने गीताबाई वामन साठे यांचा (Funeral objection) अंत्यविधी संपन्न झाला. यावेळी लाल सेनेचे गणपत भिसे, माणिकराव सूर्यवंशी, भैय्यासाहेब कांबळे, सुनिल सावंत, राजेश साठे, गोविंद सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.