Gadchiroli :- आदिवासी समाजात अन्य समाजाची घुसखोरी रोखण्यात यावी यासह अन्य मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बचाव कृती समितीच्या नेतृत्वात आज १५ ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजाचे पिवळे वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या मोर्चात जवळपास ४० ते ५० आदिवासी (Adivasi) नागरीक सहभागी झाले होते.
आदिवासी समाजात अन्य समाजाची घुसखोरी रोखण्यासह अन्य मागण्याकडे वेधले लक्ष
धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणातून दुपारी २ वाजताच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व जेष्ठ आदिवासी समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, आ.डॉ. मिलींद नरोटे, आ. रामदास मसराम , माजी आ.डॉ. देवराव होळी, माजी आ. डॉ.नामदेव उसेंडी , अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम मडावी व मान्यवरांनी केले. तत्पुर्वी शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेत मान्यवरांनी आदिवासी जनसमुदायाला मार्गदर्शन करून आदिवासी समाजावर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले. मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान(Prime Minister), राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात प्रशांत मडावी, सैनुजी गोटा, अमरसिंग गेडाम, माधव गावळ, पुष्पाताई कुमरे, गुलाबराव मडावी, जयश्री भरत येरमे, अर्घती कोल्हे, नंदु नरोटे, कुणाल कोवे, गणेश वरखडे, शिवाजी नरोटे, नितीन पदा, नंदू मटामी, कोतुराम पोटावी, नितीन पदा, कोमरी तेलामी, कालीदास कुसनाके, क्रांती केरामी, सुरेश किरंगे, डॉ. एस बि. कोडापे , अमोल कुळमेथे, निलेश शिवराम होळी, विजय तुलावी, पोर्णिमा इष्टाम, प्रा.डॉ.रमेश हलामी, रामचंद्र राऊत, केशरी मट्टामा, अशोक कुमोटी, संजय गावडे, जातुराम सुंदरसिंग नरोटे, मनोहर पाटील पोरेटी, छत्रपती मडावा, मुकेश नरोटे, गोपाल उईके, भरतजी येरमे, डॉ.निलकंठ मसराम, रमेश कुसनाके, सदानंद एम.ताराम, प्रा. मधुकर उईके, एन.झेड.कुमरे, डॉ. नितिन कोडवते यांच्यासह पदाधिकारी व आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.