कोरेगाव, चोप (Gadchiroli) :- देसाईगंज तालुक्यातील चोप ते कोरेगाव ह्या दिड किलोमीटर जिल्हा मार्गाची बाईडींग (Widening) गेल्या वर्षीच्या जानेवारी नहीन्या पासुन सुरवात सा.बा. विभागाकडून कंत्राटदारा मार्फत सुरवात केली परंतू वर्षे लोटूनही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे या मार्गावर अनेकदा अपघात (Accident) होऊन जिवीत हाणीही झाली आहे.
वर्षे लोटूनही रस्त्याचे काम अपूर्णच
शंकरपूर ते बोळधा हा 8 कि.मी. चा .जिल्हा मार्ग अरूंद होता दोन वर्षा पूर्वी शंकरपूर ते चोप पर्यंत 3 किमी रुंदीकरण पूर्ण झाला चोप ते कोरेगाव रूंदीकरण गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यांपासून या दिड कि.मी. च्या कामाला सुरवात झाली तेव्हा पासुन हा रस्ता विवादाच्या भोवर्यात सापडलेला आहे . या मार्गावर गेल्यावर्षी तिन लोकांचे अपघाती निधन झाले, पावसाळयात चिखलमय झालात्यावेळी शुद्धा अनेक अपघात झाले, वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर डांबयुक्त गिट्टी टाकुन सहा महिन्याचा कालावधी लोटला असून रस्ता पूर्ण उखडून गेला रस्त्यावरील बारीक चुरी रस्त्याच्या कडेला पडलयाने व रस्ता उखडल्या ने छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. ही बाब कंत्राटदाराच्या नजरेस आणून दिली. होळी नंतर कामला सुरवात करू असे बोलून ही अजुन पर्यंत कामाला सुरवात झालेली नाही त्यामुळे परीसरातील नागरीक व प्रवासीवर्गात सा.बा. विभाग व कंत्राट दाराबाबत रोष निर्मान झालेला असुन अजुन हा मार्ग आणखी किती बळी घेनार असा असंतोष जनक सुर नागरिकांकडून होत आहे तरी चोप ते कोरेगाव मार्गाचे काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करवा असी मागणी नागरीकान कडून होत आहे.