नदीकाठच्या शेतात गेला होता कामासाठी!
मानोरा (Gajanan Tale) : तालुक्यातील विठोली येथील गजानन टाले (Gajanan Tale) हा इसम गणपती विसर्जनाच्या दिवशी दि. ७ सप्टेंबर सायंकाळी ४ वाजता हातात विळा घेऊन नदीकाठच्या शेतात गेला असल्याची माहिती प्राप्त झाली असुन दुसऱ्या दिवसापर्यंत शोध न लागल्यामुळे गायब आहे.
सविस्तर असे की, ग्राम विठोली येथील गजानन टाले (Gajanan Tale) हा सायंकाळी चार वाजता वेळा घेऊन शेतात गेला होता. त्याचे शेत नदीकाठी असुन सायंकाळपर्यंत घरी पोहचला नसल्याने नदीपात्रात गावातील २० ते २५ मुले त्याचा पाण्यात उतरून शोध घेऊनही दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा शोध न लागल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या बाबत पोलिस पाटील यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला सुध्दा माहिती दिली असल्याचे समजते.