परभणी (Gambling Raid) : गंगाखेड येथे तिर्रट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा मारून ५८०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करून चौघांविरुद्ध शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात (Gambling Raid) गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सपोउपनि संजय साळवे, पो.शि. दत्तराव चव्हाण, राहुल खाडे, पो.शि. संग्राम शिंदे आदी शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी शहरात गस्तीवर असतांना लेक्चर कॉलनीतील एका घरात काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पो.नि. डोंगरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांची परवानगी घेत जमादार गणेश चनखोरे, पो.शि. राम पडघन यांना सोबत घेऊन शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास लेक्चर कॉलनीतील एका घरावर छापा मारून राजाभाऊ आण्णासाहेब कुरुडे वय ६२ वर्ष, वैभव राजाभाऊ कुरुडे वय २४ वर्ष दोघे रा. लेक्चर कॉलनी गंगाखेड, अंगद तुकाराम ठेंबरे वय २३ वर्ष रा. रावराजूर, परमेश्वर बडे रा. वय ४५ वर्ष रा. पांढरगाव यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून रोख ५८०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करून पो.शि. संग्राम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आले. याचा (Gambling Raid) पुढील तपास जमादार गणेश चनखोरे, पो. शि. राम पडघन हे करत आहेत.