कोरची (Ganapati Festival) : येथील मरारटोली वार्डात तेथील युवा मंडळींच्या वतीने गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी समाज प्रबोधनाचे कार्यक्रमासह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
4 सप्टेंबरला सायंकाळी असाच एक (Ganapati Festival) मनोरंजनासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोनित नगरसेवक तथा कांग्रेस चे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, उद्घाटन नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नसरू भामाणी, तसेच कांग्रेस आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
या (Ganapati Festival) कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नगरसेवक डॉ. शैलेंद्र बिसेन यांनी कोरची गावातील सध्या चांगलाच गाजत असलेला रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. या देशातील सर्वात खराब रस्ते असणारी कोरची ही एकमेव तालुका असून, या ठिकाणी असलेले नगरपंचायत चे पदाधिकारी जबाबदार आहेत, लोक ओरडत नाही. तेव्हा लोकही तेवढेच जबाबदार आहेत, असे म्हणाले.
या वेळी लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यला कांग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी साधकबाधक उत्तर दिले. इतरही लोकांनी आपापले मनोगत व्यक्त केले. (Ganapati Festival) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे तरूण सदस्य चांगली कामगिरी बजावली.




