बुलढाणा (Ganesh Festival) : मातृतिर्थ जिल्ह्याचं मुख्यालय असणार्या बुलढाणा शहराचा सांस्कृतिक संगम घडवणारा चौक, संगम चौक.. याच चौकात सद्यस्थितीतील भारतातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा डौलात उभा असून, याच शिवस्मारकात मध्यभागी महादेवाच्या पिंडीपुढे श्री गणेशाची मूर्ती बसवलेली आहे. याच मूर्तीला (Ganesh Festival) रुद्र गणेश मंडळाने पाच किलो चांदीने मढवून दिलेला आकर्षक साज, गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून.. याठिकाणी भाविकांची गर्दी बघण्यासाठी सातत्याने वाढत आहे !
जिल्हा मुख्यालय असणार्या बुलढाणा शहरात रुद्र ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविल्या जातात, रुद्र ग्रुप शिवस्मारक संगम चौक गणेशोत्सव मंडळ बुलढाणाच्या वतीने यावर्षीसुद्धा भव्य दिव्य गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात आलेली मूर्ती चरणाशी श्री हनुमान व श्रीगणेश अध्यात्मीक रूपात दाखविण्यात आले आहे.
रुद्र ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, गोरगरिबांना ब्लॅकेट वाटप, अनाथ मुलांचे शैक्षणिक खर्च उचलणे, मतदान वेळी वृद्ध लोकांसाठी अॅम्बुलन्स करून मतदान केंद्रावर घेऊन जाणे, वृक्ष लागवड करणे व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आदी उपक्रम सातत्याने घेतल्या जातात. रुद्र ग्रुपचे ढोल पथक, संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित असून.. या माध्यमातून सातत्याने सांस्कृतिक बाबतीत अग्रेसर असतो तो, रुद्र ग्रुप !
गणेशोत्सव (Ganesh Festival) काळात दररोज सकाळ व संध्याकाळ मान्यवरांच्याहस्ते महाआरती सुरु आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्याहस्ते शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी झालेल्या महाआरतीत पोलिस यंत्रणाही प्रामुख्याने सहभागी झाली होती.
चांदीची मुर्ती; अन् सोनेरी सजावट..
रुद्र गणेश मंडळाने शिवस्मारकातील केंद्रस्थानी असणार्या श्री गणेशाला चांदीने मढवले असून, संपुर्ण स्मारकाची सजावट ही सोनेरी दिसणार्या रोषणाईने करण्यात आल्यामुळे, संगम चौकात चांदी-सोन्याचाही अशाप्रकारे दिसतो संगम!