गंगाखेड (Gangakhed Crime) : खोट्या सह्या व शिक्के असलेले बनावट लेआऊट खरे असल्याचे भासवून त्या आधारे ६६ भूखंडाचे खरेदी खत केल्याचा प्रकार मार्च २०२२ ते जुलै २०२२ दरम्यान गंगाखेड येथे घडला आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधकांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात २२ जणांविरुद्ध फसवणुकीचा (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोट्या सह्या व शिक्के असतानासुद्धा ते लेआऊट खरे?
भूखंड खरेदी विक्री करण्यासाठी तयार केलेले ले आऊटचे (परिसराचा नकाशाचे) बनावट दस्ताऐवज तयार करून त्यावर खोट्या सह्या व शिक्के असताना सुद्धा ते लेआऊट खरे आहे, असे भासवून दिनांक १५ मार्च २०२२ ते दिनांक १५ जुलै २०२२ दरम्यान पाच महिन्याच्या कालावधीत
१) अनिल भगवान कांगणे रा. अरुणोदय कॉलनी गंगाखेड यांनी १३ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
२) अब्दुल हमीद मो.सोनाजी खुरेशी रा. जुना मोंढा गंगाखेड,
३) इरफान हसनजी खूरेशी,
४) नुर शेरू खुरेशी रा. जैंदिपुरा गंगाखेड,
५) शेख समद शेख जाहेद रा. सरफराज नगर,
६) सय्यद कलीम सय्यद सलीम बागवान रा. नेहरू चौक गंगाखेड यांनी २४ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
७) कुलदीप श्रीकांतराव चौधरी रा. खडकपुरा गंगाखेड यांनी ८ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
८) प्रशांत प्रदीप देवळे रा. देवळे गल्ली गंगाखेड,
९) जफर इस्माईल खुरेशीं रा. जैंदीपुरा गंगाखेड,
१०) श्रीमती ज्योती बलवान कांबळे रा. पालम,
११) शेख खाजा शेख युसुफ रा. साळापुरी,
१२) वाजीद महेबुब शेख रा. गोपा,
१३) शेख अनिस खाजा मियां रा. ब्रम्हपुरी,
१४) आशा गिन्यानदेव सानप रा. सावळी रामनगर आदींनी प्रत्येकी १ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केली.
१५) अनिरुद्ध अनंतराव अंबेकर यांचे तर्फे कु. मु. अरविंद अनंतराव अंबेकर रा. वकील कॉलनी गंगाखेड
१६) सुरेखा संजय बचाटे रा. सारडा कॉलनी गंगाखेड यांनी प्रत्येकी २ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
१७) प्रकाश लिंबाजीराव राठोड रा. भाग्यनगर गंगाखेड,
१८) सय्यद पाशा सय्यद इस्माईल,
१९ ) सय्यद माजीद सय्यद मोईज दोघे रा. राणीसावरगाव,
२०) शाम दिनकरराव कुलकर्णी रा. देवळे गल्ली गंगाखेड यांनी प्रत्येकी १ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
२१) दिलीप बाबुलाल शर्मा रा. जुना मोंढा परभणी यांनी ५ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
२२) देवेंद्र राघवेंद्र पाठक रा. योगेश्वर कॉलनी गंगाखेड यांनी १ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केले.
२२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
वरील एकूण २२ जणांनी लोकांची व शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने एकूण ६६ भूखंडाचे खरेदी खत (दस्त नोंदणी) केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने वरील लोकांविरुद्ध फसवणुकीचा (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन दुय्यम निबंधक जि.एस. अहमद यांनी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता असे फिर्यादीत नमूद करून दुय्यम निबंधक अशोक विष्णु जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १५ मे रोजी रात्री उशिराने एकूण २२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ले आऊटच्या आधारे ६६ भूखंडाचे खरेदी खत केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने भूखंड मांफियांसह भूखंड खरेदी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police) पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पो.ना. दत्तराव चव्हाण हे करीत आहेत.




