गंगाखेड शहरातील संत जनाबाई कॉलेज जवळील उदघाटन सोहळा थाटात संपन्न
परभणी/गंगाखेड (Gangakhed Legislative Assembly) : वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गंगाखेड नगरपरिषद अंतर्गत दहा लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते आज रोजी गंगाखेड शहरातील गोंधळी रोडवरील संत जनाबाई कॉलेज जवळ संपन्न झाले. या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून (Gangakhed Legislative Assembly) गंगाखेड शहराची पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
गंगाखेड शहर वासियांना लवकरच दररोज पिण्याचे पाण्याची नियोजन होणार असल्याची गवाही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपला मनोगत व्यक्त करताना सांगितले. उद्घाटन सोहळ्याला उपविभागीय अधिकारी जीवराज, गंगाखेड नगरपरिषद चे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, सुभाष शेठ नळदकरकर, ज्ञानेश्वर महाजन, इकबाल चाऊस, प्रशांत काबरा, प्रताप मुंडे, दिपक तापडिया, गोविंद तापडिया,माणिकराव आळसे, उद्धव शिंदे, महेश आप्पा शेटे, खालेद शेख, पिराजी कांबळे,एडवोकेट कलीम शेख, संतोष पेकम, सैफ चाऊस यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.