परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : रात्रीच्या अंधारात ओल सावलीत अंधारात दबा धरून बसलेल्या दोन संशयितांना रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांनी ताब्यात घेऊन (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सोमवार ३० डिसेंबर रोजी रात्री रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी परसराम परचेवाड, शेख नबी, जगन्नाथ शिंदे, राहुल खाडे हे मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास बस परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाखालील भागात गस्त करीत असतांना उड्डाण पुलाच्या भिंतीच्या ओल सावलीत कोणीतरी संशयितरित्या आपले अस्तित्व लपवून बसल्याचे निर्दर्शनास आल्याने (Gangakhed Police) पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे कैलास विष्णू शिंदे वय ३० वर्ष रा. शेळगाव ता. सोनपेठ असे सांगितले व रात्रीच्या वेळी येथे थांबण्याबाबत समर्पक उत्तर न दिल्यामुळे त्यास ताब्यात घेतले.
त्याचप्रमाणे २ वाजेच्या सुमारास संत जनाबाई मंदिर रस्त्यावर गस्त करीत असतांना संत जनाबाई मंदिर रस्त्यावरील कब्रस्तान जवळील पत्र्याच्या शेडजवळ अंधारात श्रावण नारायण ब्रिगणे वय ३० वर्ष रा. महातपुरी ता. गंगाखेड हा संशयास्पदरित्या मिळून आल्याने पोलीस शिपाई परसराम परचेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास अनुक्रमे जमादार शंकर रेंगे पाटील व जमादार मारोती माहुरे हे करीत आहेत.