आ. पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : ‘देशोन्नती इम्पॅक्ट’!
लातूर (Crop Insurance company) : लातूर जिल्ह्यासाठी खाजगी नव्हे, तर सरकारी पीक विमा कंपनी मिळेल, यासाठी लातूर जिल्ह्यात पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनीवर द्यावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
प्रीमियम सबसिडी देत, राज्य व केंद्र सरकारने लातूर जिल्ह्यासाठी गतवर्षी दिलेल्या एसबीआय (Crop Insurance company) पीकविमा कंपनीचे लातूर जिल्ह्यासाठी असलेले एग्रीमेंट ऐवजी आयसीआयसीआय लोम्बार्ड या खाजगी कंपनीला लातूर जिल्हा पीक विमासाठी करारबद्ध करण्याचे सुरू असल्याची वृत्त मालिका दैनिक ‘देशोन्नती’ने मंगळवारी व बुधवारी (दि.१० व ११) चालविली होती. आमदार अभिमन्यू पवार यांनी या वृत्ताची दखल घेत या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी केली.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषद आवारातील पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून या पुतळ्याचे अनावरण आपल्या हस्ते करण्यात यावे, अशी विनंतीही यावेळी आ. पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच पोलीस पाटील बांधवांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन वाढवून ६५ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत असून या मागणीचा सकारात्मक विचार करावा तसेच औसा मतदारसंघातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा व औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागत असलेला अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी केली.
शेतकऱ्यांना आशा…
लातूर जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड ही (Crop Insurance company) पीक विमा कंपनी देण्याच्या घाट शासकीय पातळीवर घातला जात असल्याचे वृत्त दैनिक ‘देशोन्नती’ने दिले होते. या वृत्ताची दखल जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार अभिमन्यू पवार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी यांनी घेत याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा चालविला. या प्रयत्नामुळे लातूर जिल्ह्यासाठी एआयसी पीक विमा कंपनीशी सरकार एग्रीमेंट करेल, अशी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.