हिंगोली (Durga Festival) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात आली होती. आता टप्या टप्याने जिल्हाभरात सर्वत्र दुर्गादेवीचे विसर्जन केले जात आहे.
जिल्ह्यात ७९९ दुर्गादेवीची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. २ ऑक्टोबरला जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणे हद्दीमधील २३५ ठिकाणी दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात आले. तर ३ ऑक्टोबरला २६२ ठिकाणी दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे महोत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी (Durga Festival) विसर्जन मिरवणुकीत गुलाल अथवा नवरंगी गुलाल उधळण्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. बँड-ढोल-ताशाच्या गजरात सर्वत्र मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
दुर्गादेवी विसर्जन निमित्ताने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्यासह ६२ पोलिस अधिकारी, ५२६ अमलदार, ४७० पुरुष होमगार्ड व१०० महिला होमगार्ड, २ आरसी पथक, २ राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात केला होता.