कन्हान (Gold medalist Jiya Kamble) : रायपूर येथे झालेल्या कुराश खेळातील राष्ट्रीय चॅम्पियन शिप स्पर्धे मध्ये सुवर्णपदक मिळालेली खेळाडू कु. जिया अविनाश कांबळे (Gold medalist Jiya Kamble) हिचा श्री. संताजी अखिल भारतीय तेली समाज कन्हान शहर च्या तर्फे सत्कार व अभिनंदन करून उज्वल भविष्यकारिता शुभेच्छा दिल्या.
रायपुर येथे संपन्न राष्ट्रीय कुराश स्पर्धा सबजुनियर चैम्पियनशिप २०२५-२६ या स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या खेडाळुनी महाराष्ट्र व नागपुर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व क्रिडा प्रशिक्षक अमितकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनात बिहार, पंजाब व हरियाणा येथील खेडाळुशी लढत दिली. विजयश्री खेचुन आणत घवघवीत यश संपादित केले. यात कु. जिया अविनाश कांबळे (Gold medalist Jiya Kamble) इयत्ता ९ वी हिने – २८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावुन विजयी होऊन शाळेचे व कन्हान- कांद्री शहराचे देशात नाव लौकिक केले.
टेकाडी येथे रविवार (दि.२३) सप्टेंबर ला सायंकाळी श्री. संत संताजी अखिल भारतीय तेली समाज संघटन कन्हान शहर व पारशिवनी व्दारे विजेत्या विद्यार्थी खेडाळुंचे भव्य स्वागत करून गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण सचिव सूर्यभान जी चकोले, कन्हान शहर अध्यक्ष व सकाळचे पत्रकार सुनील सरोदे, कार्याध्यक्ष व पत्रकार ऋषभ बावणकर, उत्तमराव वाघमारे, राजेश लेंडे, जगदिश पोटभरे, राजेश लेंडे, मनोहर कोल्हे, अविनाश कांबळे, मनिषा कांबळे, पत्रकार किशोर वासाडे, कृष्णा कांबळे, विशाधर कांबळे सह नागरिकांनी उपस्थित राहुन विजयी विद्यार्थी खेळाडूचं सत्कार केला.