Gadchiroli :- मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून ठिकठिकाणी मिळून आलेला ९१ हजार ५०० रुपयांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करीत दोन विक्रेत्यांवर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला. ही कृती अहेरी पोलीस, मुक्तिपथ टीम व गावातील महिलांनी संयुक्तरीत्या केली.
पोलिस, मुक्तिपथ व महिलांची संयुक्त कृती
अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या नागुलवाही येथे मुक्तिपथ तर्फे दोन दिवसीय सघन भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील प्रतिष्ठीत नागरिक व महिलांची बैठक घेऊन अवैध दारूविक्रीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. जंगल परिसरामध्ये मोहसडवा असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस विभागाच्या(Police Department) सहकार्याने मुक्तीपथ टीम व महिलांनी जंगल सवारी केली. यावेळी एका ठिकाणी जिवंत हातभट्टी मिळाली. परंतु, दारूविक्रते घटनास्थळावरून पसार झाले. कृती दरम्यान जंगल परिसरामध्ये विविध ठिकाणी १६ ड्रम मोह सडवा, चार स्टील गुंड व दारू काढण्याचे तिन स्टील मोठे गुंड असा जवळपास ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणाचा तपास करून दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी, पोलीस हवालदार दादाराव सिडाम,पोलीस शिपाई विनोद आत्राम, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, प्रेरक तृप्ती मंडल, पल्लवी तूपसुंदर यांच्यासह गावातील १३ महिला उपस्थित होत्या.