विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दिल्या सूचना
गोरेगाव (Goregaon school) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद प्रशालेला हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अचानक भेट देऊन शालेय कामकाज विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासुन सोयी सुविधेची पाहणी केली आहे. प्रसंगी शाळेच्या वतीने मुअ गीरी यांनी जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला आहे. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी (Goregaon school) शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याच्या सुचना दिल्याचे वृत्त आहे.
गोरेगाव जिल्हा परीषद प्रशाला निजाम कालीन आहे. शाळेच्या गुणवत्तेचा आलेख कायम चढत्या पायरीचा राहला आहे. त्याच कारणाने विद्यार्थी संख्या कधीच कमी न होता दरवर्षी अधीकची वाढत गेलेली आहे. नुकतेच कार्यरत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फ बंडु कावरखे यांनी समिती सदस्य पालक नागरीकांच्या पाठपुराव्याने संच दुरूस्तीला मान्यता प्राप्त करूण अधिकच्या १० शिक्षकांच्या पद भरतीचे आदेश मिळविले आहेत.
जिल्ह्याला कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी कार्यभार स्विकारताच जिल्ह्यातील प्रशासकीय,निम शासकीय कामकाज सुता सारखे सरळ होऊन कर्तव्याची दक्षता वाढल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी अचानक कुठल्याही कार्यालयास भेट देऊन कामकाजाची पाहणी करीत असल्याने सर्वत्र सतर्कता दिसुन येत आहे.
स्थानिक जि.प. प्रशालेला (Goregaon school) भेट देण्याचा दिवस टाळुन त्यांनी १८ जुन रोजी अचानक भेट देत शालेय कामकाजाची सुक्ष्मतेने पाहणी करत विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासुन विद्यार्थी संख्या वर्ग खोल्या आदी इंत्यभुत माहिती घेत सोयी सुविधा जानुन घेतल्या प्रसंगी शाळेच्या वतीने मुअ गीरी यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी सोनटक्के यांचा सत्कार केला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप उर्फ बंडु कावरखे, ग्रा प सदस्य जी एम खिल्लारी पाटील, प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील,सतीष पाटील, अंकुश पाटील, उपाध्यक्ष रामेश्वर कावरखे आदीसह शिक्षक, शिक्षीका वर्गाची उपस्थिती होती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता भविष्यात वाढविण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या आहेत. शाळा पाहणी नंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन वैद्यकीय विविध विभागाचा लेखाजोखा, कामकाज, उपलब्ध औषधांची माहिती जानुन घेत रूग्णांच्या वैद्यकीय सेवेत तत्पर राहण्याच्या सुचना दिल्याचे वृत्त आहे.




 
			 
		

