१०४ गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान
गोंदिया (Government Yojana) : दुर्गम व अतिदुर्गम भागात राहणार्या आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तिकरणासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १०४ आदिवासी गावांमध्ये १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शिबिर आयोजित गावकर्यांना थेट गावातच (Government Yojana) शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यानुसार दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तिकरणासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येणार आहे. यामध्ये (Government Yojana) जिल्ह्यातील १०४ गावांचा समावेश असून गावागावात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गोंदिया, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनो/मोर, सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनुसुचित जमातीच्या नागरिकांकरिता मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बैंक खाते, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान निधी, जॉब कार्ड, असे अनेक दाखले त्यांच्या वास्तव्यावर जाऊन उपलब्ध करुन देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच यासोबत आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसुल अशा विविध विभागांच्या (Government Yojana) योजनांचाही लाभ या शिबिरातुन नारिकांना मिळणार आहे. या मोहिमेचा मुख्य उददेश आदिवासी नागारिकांना केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ गावपातळीवर उपलब्ध करुन देणे हा आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय आदिवासी बहुल गावे
आदिवासी बहुल गावांमध्ये १५ ते ३० जूनपर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गोंदिया तालुका -४ गावे, तिरोडा-३ गावे, आमगाव तालुका – २ गावे, सालेकसा-१५ गावे, देवरी-४९ गावे, अर्जुनी/मोर-१५ गावे, सडक अर्जुनी-११ गावे व गोरेगाव तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्टॉल लावुन तेथे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलिस पाटील, महसुल सहायक, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, नोडल अधिकारी हे शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त अनुसुचित जमातीच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवरी जिल्हा गोंदियाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले आहे.
एका छताखालली मिळणार लाभ
अभियानाचा एक भाग म्हणून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या (Government Yojana) योजनेअंतर्गत जून मध्ये विशेष मोहिम राबवून देवरी जिल्हा गोंदिया प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील १०४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून पर्यंत सकाळी १०.०० ते सांयकाळी ५.३० वाजेपर्यंत जनजागृती शिबिराच्या माध्यमातुन मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र, जॉब कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, पीएम-किसान, जनधन खाते असे अनेक दाखले व योजनांचा लाभ एका छताखाली व प्रत्यक्ष ग्रामस्तरावर जाऊन उपलब्ध करुन देता येणार आहे.