अखिल महाराष्ट्र स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचा आरोप
हिंगोली (Grains shopkeepers) : जिल्ह्यात बाहेरगावी गेलेल्या शिधापत्रिका धारकांचे ट्रांजेक्शन का झाले नाही, या नावाखाली स्वस्तधान्य दुकानदारांना नोटीस पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने ३१ डिसेंबरला निवेदनाद्वारे करून या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकार्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
हिंगोलीचा जिल्हा पुरवठा विभाग हा मागील दोन दिवसापासून चांगलाच वादाच्या भोवर्यात अडकला आहे. (Grains shopkeepers) स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने मध्यंतरी आ.तान्हाजी मुटकुळे यांना निवेदन देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजळ यांची बदली करण्याची मागणी केली होती. त्यावरून आमदार मुटकुळे यांनी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली असता सचिवांनी या प्रकरणात अहवाल तातडीने मागविण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत.
त्यानंतर आता ३१ डिसेंबरला अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरूडे, शिवाजी देशमुख, मधुकर देशमुख, सुदाम नागरे, नारायण राठोड, साहेबराव तिडके, एच.आर.गादेकर यांच्यासह इतर (Grains shopkeepers) स्वस्तधान्य दुकानदारांनी निवेदन दिले असून जिल्हा पुरवठा अधिकारी विनाकारण दुकानदारांना त्रास देऊन आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे. गावातील बाहेरगावी गेलेल्या शिधापत्रिका धारकांचे ट्रांजेक्शन का झाले नाही यावरून नोटीस देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. दुकान निलंबित करून इतर ठिकाणी जोडण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
दुसरी संघटना उतरली मैदानात
जिल्हा पुरवठा अधिकार्याच्या विरोधामध्ये यापूर्वीच रास्तभाव दुकानदार संघटनेने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे तक्रार केली असता आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने दंड थोपटून जिल्हा पुरवठा अधिकार्यावर अनेक आरोप केल्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.