ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठराव मंजूर!
परभणी (Gram Sabha) : “दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात, मुलांचे भविष्य अंधारात जाते. आता बामणीत हे सहन केले जाणार नाही!” अशा जाज्वल्य भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी एकमुखाने दारूबंदीचा ठराव परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या (Villagers) उपस्थितीत ठराव मंजूर केला.
मुंबईहून सुरू झालेल्या देशी दारूच्या दुकानाविरोधात महिलांनी पुढाकार घेतला. २८ ऑगस्ट रोजी सरपंच कमलबाई बोराडे, ग्रामसेवक शेळके, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत गावात कुठल्याही प्रकारच्या दारू विक्रीला कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव सर्वसंमतीने पारित झाला. “दारूमुक्त बामणी” हेच आमचे ध्येय, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून ठराव वरिष्ठ प्रशासनाकडे (Senior Management) पाठविण्यात आला आहे. लवकरच बामणीत संपूर्ण दारूबंदी लागू होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.




 
			

