सदभाव सेवाभावी संस्थेचा उपक्रम
सहयोग इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा हिंगोली
जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली
जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली
हिंगोली (Sadbhav Tree Ambulance) : येथील तापडिया इस्टेट मध्ये 28 मे रोजी आमदार तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर,ज्येष्ठ पत्रकार नंदुभाऊ तोष्णीवाल, माजी उपनगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर,व्यापारी कांतराव गुंडेवार, प्रवीणभाऊ सोनी, ओमप्रकाश अग्रवाल,आय एम ए चे डॉ. राम मुंढे, डॉ. दिपक डोणेकर, डॉ. संजय नाकाडे, डॉ. रोकडे डॉ. कुणाल कोंडेवार, डॉ. महारुद्र भोसले, डॉ. गणेश अवचार, ऍड. शेषराव पतंगे, प्रकाश मुठाळ,राजेश सोमाणी, दिलीप झंवर,नाना नायक,विनोद खरात हस्ते सदभावच्या वृक्ष ॲम्बुलन्स चे थाटात उदघाटन करण्यात आले..या वृक्ष ॲम्बुलन्स साठी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा हिंगोली आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली चे सहकार्य लाभले.
दिवसेंदिवस पर्यावरणाची परिस्थिती बिकट होत चालली. प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड, प्रदूषण, सिंचनाची सोय नाही. एकल वापर प्लास्टिकचा महापूर, प्रचंड अस्वछता यामुळे शहर आणि परिसरात यासाठी जनजागृती करने, प्रत्यक्ष झाडं लावणे आणि जगविण्यासाठी या (Sadbhav Tree Ambulance) वृक्ष ॲम्बुलन्सचा उपयोग होणार आहे.ही वृक्ष ॲम्बुलन्स दान, देणगी स्वरूपात चालविण्यात येणार आहे.यामध्ये फावडे, टोपले, टिकास, खड्डे करण्याची मशीन आणि उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी एक हजार लिटर चे टँकर बसविण्यात आले.
मागील 12 वर्षांपासून सातत्याने सदभाव सेवाभावी संस्था पर्यावरण वृक्ष लागवड आणि संवर्धन, स्वच्छता, आरोग्य, सिंचन, जलसंवर्धन, प्लास्टिक बंदी साठी कार्यरत आहे. यावेळी डॉ. अभयकुमार भरतीया रत्नाकर महाजन, स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर,डी. पी. शिंदे,महेश शहाणे,हर्षवर्धन परसावळे,सुदर्शन महाजन, मनोज शर्मा,संजय खिल्लारे, धीरज शर्मा,महेश मोकाटे,खेडेकर, पत्रकार प्रद्युम्ण गिरीकर, सचिन कावडे,सुनील पाठक,विजय गुंडेकर,निलेश गरवारे, मोहसीन खान, सतीश राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.