विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
अमरावती (Kabaddi Tournament) : आपल्या मातीतला खेळ, ग्रामिण भागातील खेळ म्हणजे कबड्डी हाेय. परंतू या खेळाला राजाश्रय नसल्याने हा खेळ अजून बराच मागे राहिला. विदर्भाच्या मातीत अनेक नामवंत खेळाडू या खेळातून घडले आहे. त्यामुळे येणाèया काळात या खेळाला राजाश्रय मिळाल्यास पुढील ऑलम्पिक स्पर्धेत या खेळाचा समावेश हाेईल असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
आजपासून अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये 71 वी विदर्भ राज्य अजिंक्यपद (Kabaddi Tournament) कबड्डी स्पर्धा अमरावती जिल्हा कबड्डी (संघ) असाेसिएशन, अमरावतीच्या यजमानपदाखाली सुरु झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सायंकाळी पार पडला. या उद्घाटन सत्रच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व विदर्भ कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष रामदास तडस हाेते. मंचावर आमदार राजेश वानखडे, आ.प्रताप अडसड, माजी पालकमंत्री प्रविण पाेटे, महाराष्ट्र ऑलम्पिक असाेसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, कबड्डी असाेसिएशन विदर्भाचे सचिव प्रदिपसिंह ठाकूर, सहसचिव अजय शिंगाडे, प्रसिध्द उद्याेजक कैलास गिराेळकर, अमरावती महानगर कबड्डी (संघ) असाेसिएशनचे अध्यक्ष दिपक गुल्हाने, प्रा. संजय तिरथकर, शेखर भाेयर, दिपक गुल्हाने आदी उपस्थित हाेते.
यावेळी विदर्भाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी काेणत्याही खेळाला राजाश्रय नसेल तर ताे टिकू शकत नाही. कुस्तीला सध्या माेठ्या कंपन्यांनी राजाश्रय देवून त्यातील खेळाडू दत्तक घेतले आहे. त्यामुळे आज कुस्तीमधील स्थिती चांगली आहे. मात्रब ज्या विदर्भात अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. त्या विदर्भातील कबड्डी खेळाला राजाश्रय नसल्याने ताे खेळ मागे पडत आहे. त्यामुळे येथील खेळाडूंना दत्तक घेवून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
आ.राजेश वानखडे यांनी सुध्दा विदर्भाचा संघ मागे राहणार नाही यासाठी (Kabaddi Tournament) कबड्डीच्या ज्या खेळाडूंकडे चांगले स्किल आहे त्यांना नव व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल अशी ग्वाही यावेळी दिली. अॅड. प्रशांत देशपांडे यांनी धर्नुविद्या संघटनेच्या खेळाडूंना सुध्दा कंपनीने प्रायाेजकतत्व दिल्याने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू चमकत आहे. तसेच या खेळात सुध्दा समाहीक प्रयत्न करून खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी पालकमंत्री प्रविण पाेटे यांनी ऑलम्पिक मध्ये कबड्डी खेळाचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासाेबतीने सर्वांनी प्रयत्न करून या अस्सल मातीतल्या खेळाला जिवंत ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
येणाèया काळात निश्चित चांगले खेळाडू दत्तक घेवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आ. प्रताप अडसड यांनी सुध्दा याप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती महानगर कबड्डी (संघ) असाेसिएशनचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी केलेे, संचालन कबड्डी असाेसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप इंगाेले यांनी व आभार सचिव नितीन सराफ यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत याेगेश भाेसले, शरद गढीकर, मिलींद पाटील, निलेश सराफ, राजेश गाडे, धनराज यादव, गणेश वरुडकर, अतुल देशमुख, सतिष ठाकूर, राजेंद्र तुळे, सचिन मेहरे यांनी केले. यावेळी संपूर्ण विदर्भातील महिला व पुरुष कबड्डी संघ व कबड्डी प्रेमी नागरीक उपस्थित हाेते.
विवेक गुल्हाने यांचा सत्कार
विदर्भ राज्य कबड्डी (संघ) असाेसिएशनचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी या स्पर्धेसाठी केलेल्या परिश्रमामुळे ही (Kabaddi Tournament) स्पर्धा आयाेजित झाली. त्याच्या या कार्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.