लोणार (Sri palanquin) : श्री च्या पालखीचे (Sri palanquin) चार वाजे दरम्यान लोणार शहरात आगमन झाले. लोणार नगरवासी यांनी टाळ मृदंगाच्या आवाजात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. लोणार शहरात रांगोळी काढून ठिक ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावून भक्तांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. पालखीचा मुक्काम ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय लोणी रोड लोणार येथे मुक्कामी होती.
ग्रामीण भागातून भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्यासह (Sri palanquin) भावीक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला त्या अनुषंगाने लोणार नगरी मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. या दरम्यान ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोक ठेवण्यात आला होता. सकाळी दिनांक सहा ऑगस्ट रोजी लोणार वरून मेहकर येथे (Sri palanquin) श्रींच्या पालखीचे आगमन झाले.