Yawatmal Murder :- राळेगाव येथे आजीच्या सतत बडबडीमुळे त्रस्त झालेल्या नातवाने तिला कुर्हाडीने (Axe) मानेवर मारून हत्या केल्याप्रकरणी नातवाला यवतमाळ येथील जिल्हा न्यायाधीश एस यु बघेले यांनी हा जन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच त्याला दहा हजार रुपये दंड देखील करण्यात आला आहे.
हत्येप्रकरणी आरोपीला आजन्म कारावास
या संदर्भात विस्तृत माहिती अशी की, राळेगाव पोलीस स्टेशन (Police Station)अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथील शकुंतलाबाई मारुती राऊत वय वर्ष ७० आणि तिचा नातू नितीन राऊत वय २१ हे दोघेजण घरी होते. आजी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने बडबड करीत असायचे दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी नितीन राऊत यांनी घरच्या बकर्या चारायला नेल्या नाहीत या कारणावरून तिने बडबड केली याचा राग त्याने मनात धरून तिच्यावर कुर्हाडीने डोक्यावर, मानेवर वार करून ठार केले. या घटनेची तक्रार नितीनचे वडील मोरेश्वर राऊत यांनी पोलीस स्टेशनला केली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी नितीन राऊत याला अटक केली.
नऊ जणांची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात एकूण नऊ साक्षीदार तपासले यातील सरकारी वकील यांचा युक्तीवाद न्यायालयाने (Court) लक्षात घेतला तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर यांनी दिलेला पुरावा त्यासोबत साक्षीदारांनी दिलेला पुरावा विचारात घेऊन अखेर आरोपी नितीन राऊत याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे. संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर नितीन राऊत यांच्या विरोधात आरोप पत्र जिल्हा न्यायाधीश एस यु बघेले यांच्या न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून मंगेश एस गगलवार तर पैरवी अधिकारी म्हणून योगेश हरिदास वाघमोडे यांनी काम पाहिले या घटनेचा संपूर्ण तपास तत्कालीन पीएसआय पोलीस उपनिरीक्षक दिलीप गोपीचंद पोटभरे यांनी केला होता.