परभणी कुलगुरुंचे प्रतिपादन
परभणी () : कृषी शिक्षणातून स्वंय रोजगारासह विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले. वनामकृवित कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मंगळवार ३ डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन (Agricultural Education) साजरा करण्यात येतो. वनामकृवित आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. इंद्र मणि, व्यासपीठावर डॉ. भगवान आसेवार, संतोष वेणीकर, डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राजेश कदम, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. आर.जी. भाग्यवंत, डॉ. गजानन भालेराव, डॉ. एम.जी. जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु डॉ. इंद्र मणि म्हणाले की, कृषी शिक्षणातून हरित क्रांती झाली. लोकसंख्येची वाढ होऊन देखील भारत देश शेती उत्पादनामध्ये सक्षम झाला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कृषी शिक्षण दिनानिमित्त भारतीय कृषी अणुसंधान परिषदेच्या कृषी शिक्षण विभागाचे उप महासंचालक डॉ. आर.सी. आग्रवाल यांनी ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले.
वनामकृवित कृषी दिन उत्साहात
कृषी शिक्षणातून संशोधक आणि कौशल्यपुर्ण मनुष्यबळाची निर्मिती होत आहे. कृषी शिक्षणास मजबुत करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत. कृषी आणि संलग्न शाखेतील महाविद्यालयं सुरू केली जात आहेत. कृषी शिक्षणातून युवकांना स्वयंरोजगारासह शासकीय आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.