मानोरा (Manora) :- स्थानिक एल. एस. पी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धामणी मानोरा येथे दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त, त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष माननीय व्ही. बी. पाटील व प्राचार्य संजय हांडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन केले.
१३४ व्या जयंतीनिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी राज्यघटनेचे महत्व अधोरेखांकित करून राज्यघटना यशस्वी करायची असेल तर शासन, प्रशासन व प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून अधिकार मागण्यापेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन केले तरच लोकशाही आणि राज्यघटनेतील सर्व तत्वे आपल्या देशात यशस्वी होतील असे मत मांडले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग जिल्हा कार्यालय वाशिम, यांच्या आदेशानुसार हायस्कूलमध्ये दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह पाळल्या गेला होता, त्या समता सप्ताहाची सुद्धा सांगता करण्यात आली. सदर सप्ताहान्तर्गत सूचीप्रमाणे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते.
या अभिवादन सोहळ्याकरिता शिक्षक कु. प्रभा देशमुख, कु.वंदना पाटील, चिंतामण कळंबे, छत्रपती घोंगे, कु.अर्चना काळे, प्रविण ढबाले, धनराज पाटील, अजय माल्टे, घनश्याम दळवी, रविकांत घोडके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी राजू पवार,संजय पाटील, जगदीश पाटील, सुनील वासनिक व संतोष होलगरे उपस्थित होते.