हिंगोली (Hingoli district) : हिंगोली जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला (Richa Bagla) ह्या उद्या गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा पालक सचिव (Richa Bagla) बागला ह्या घेणार आहेत. तसेच त्यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामाची सद्यस्थिती व कामावर झालेल्या खर्चाचा आढावा घेणार आहेत.
या (Hingoli district) बैठकीस सर्व विभाग प्रमुखांनी आपल्याकडील योजनांच्या अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.




