बुलढाणा (Gudi Padwa) : केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी त्यांच्या मेहकर येथे निवासस्थानी “गुढी” (Gudi Padwa) उभारून सहपरिवार साजरा केला “पाडवा” !
“गुढी नव्या आशा-उमंगांची, गुढी हिंदू संस्कृतीच्या अभिमानाची..” हा मराठमोळा संदेश देत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मेहकर जि.बुलढाणा येथील निवासस्थानी आज रविवार 30 मार्च रोजी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) व सौ. राजश्रीताई प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक गुढीची विधिवत पूजा करून (Gudi Padwa) हिंदू नववर्षाचे मंगलमय स्वागत केले. यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, सौ.मयुरीताई ऋषी जाधव उपस्थित होते.