मानोरा (Gyayak Patni) : कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात निवडणुकीची रंगत आता चांगलीच जोर धरू लागली आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघा आठवडा भराचा अवधी उरला आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार ज्ञायक पाटणी (Gyayak Patni) यांच्या प्रचाराला चांगलीच गती आली असुन महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कारंजा व मानोरा शहरात प्रचार सुरू केला आहे. तर उमेदवार पाटणी यांनी मतदारसंघातील लाखाच्या वर मतदारांच्या भेटी गाठी घेऊन संवाद साधला असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत.
मतदार संघातील जिल्हा परिषद आसोला खुर्द सर्कलमधील गव्हा, देवठाणा, विठोली, सोमनाथनगर, सोमाठाणा, आमगव्हाण, कोंडोली, अभयखेडा, आदी गावात आठवडी बाजाराच्या दिवशी दि. १३ नोव्हेंबर रोजी जाऊन उमेदवार ज्ञायक पाटणी यांनी गावात जाऊन थेट मतदार राजाशी संवाद साधला. यावेळी त्यांचे उत्सफुर्त स्वागत करण्यात आले. लोकनेता स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांनी दहा वर्षांत केलेल्या विकास कामाची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येणार असुन महा विकास आघाडीचे सर्व्हेसर्वा शरदचंद्र पवार, उध्दव ठाकरे व राहूल गांधी यांच्या व महा विकास आघाडीच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शेतकरी, शेतमजुर, सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय देण्याचे काम आपण सतत करत करणार, अशी (Gyayak Patni) मतदारांना ग्वाही देत संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत महा विकास आघाडीचे कार्यकर्ते विजयासाठी दिवस रात्र जीवाचे रान करून मेहनत घेत आहेत. यावेळी त्यांच्या समवेत सर्कलमधील काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर, सुधाकर चौधरी, निळकंठ पाटील, रमेश नागापुरे, प्रकाश राठोड, सुनील जामदार, आनंद देशमुख, मुकेश चव्हाण, गजानन ठाकरे, महेश राठोड, निखिल वानखडे, शेखर राठोड, प्रविण राऊत आदी सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.