उद्या बुलढाणा येथे कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन!
बुलढाणा (Karyakarta Melava) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदी आ. शशिकांत शिंदेंची (Shashikant Shinde) निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने मेळावे, बैठका, आंदोलनांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे काम हाती घेतले आहे. त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहेत. सर्वप्रथम दिनांक ९ सप्टेंबर रोजी ५ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी राजवाड्यावर सिंदखेड राजा येऊन मासाहेब जिजाऊंना अभिवादन करणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 10 सप्टेंबर रोजी बुधवार रोजी राष्ट्रवादी भवन, बुलढाणा येथे (Karyakarta Melava) कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार असून, विदर्भ प्रभारी, माजी मंत्री अनिल देशमुख, विदर्भ प्रभारी, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे , जिल्हा निरीक्षक विलास चव्हाण यांची विशेष उपस्थिती सह जिल्ह्यातील सर्व प्रदेश मधील पदाधिकारी तथा ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तथा त्यांच्या सर्व कार्यकारणी. सर्व विभागांचे जिल्हाध्यक्ष तथा त्यांच्या कार्यकारण्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व आजी, माजी पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी तथा (Karyakarta Melava) कार्यकर्त्यांनी मेळाव्यास वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रसेन्नजीत पाटील यांनी केले आहे.




